महापालिका आयुक्तांच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना !

पुणे – महापालिकेने दक्षिण पुण्यातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी एक दिवस वेगवेगळ्या भागांतील पाणी आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आठवडाभर कार्यवाही करून त्याचा फेरआढावा घेऊन त्यानुसार पाणीकपातीविषयी निर्णय घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या.
शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असतांनाही केवळ नियोजनाचा अभाव आणि वितरणातील त्रुटी यांमुळे महापालिकेने ही पाणीकपात लागू केल्याचा आरोप केला जात आहे. या भागातील नागरिकांकडून पाणीकपातीस विरोध होत आहे. एक दिवस पाणी बंद ठेवल्यानंतर त्याचा दुष्परिणाम पुढील २ ते ३ दिवस होतो.