आळंदी येथे भाविकांसाठी विनामूल्य वाहनतळाची सोय !

संत ज्ञानेश्वर

आळंदी – ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायण सोहळ्यासाठी आळंदीमध्ये आलेल्या भाविकांच्या वाहनांच्या सोयीसाठी नगर परिषदेने ४ ठिकाणी विनामूल्य वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. पारायणासाठी आलेल्या भाविकांच्या मुक्कामाची सोय आळंदीतील विविध शाळा आणि धर्मशाळा यांमध्ये केली आहे. नगर परिषदेकडून भाविकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी इंद्रायणी आणि घाट परिसर स्वच्छ केला जात आहे, तसेच इंद्रायणी नदीवरील नवा पूल आणि कोल्हापूर बंधारा यांमधील स्वच्छता कर्मचारी करत आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख श्रद्धा गर्जे यांनी दिली.