|

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील मदारीपूर जिल्ह्यातील शिरखरा युनियनमधील आलम मीर कांडी गावातील २०० वर्षे जुने वडाचे झाड धर्मांध मुसलमानांनी तोडले. हिंदूंसाठी हे झाड श्रद्धेचे प्रतीक असल्याने मुसलमानांनी त्याच्या विरोधात फतवा काढला होता. त्यानंतर ते कापण्यात आले. झाड कापण्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात काही मुसलमान मोठ्या करवतीचा वापर करून झाड कापत असल्याचे दिसत आहेत.
१. स्थानिक हिंदूंच्या मते हे २०० वर्षे जुने वडाचे झाड केवळ एक झाड नव्हते, तर स्थानिक लोकश्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा यांचे जिवंत प्रतीक होते. हे झाड गेल्या अनेक दशकांपासून स्थानिक लोककथा, कथा आणि पूजा पद्धतींचा एक भाग होते. गावकर्यांचा असा विश्वास होता की, या झाडात काहीतरी ‘चमत्कारिक शक्ती’ आहे. त्यामुळेच ते इथे यायचे, दिवे पेटवायचे, हात जोडून आशीर्वाद मागायचे.
२. काही दिवसांपूर्वी स्थानिक मुसलमान धर्मगुरूंची एक बैठक बोलावण्यात आली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला की ही प्रथा ‘शिर्क’; म्हणजेच इस्लामच्या मूलभूत श्रद्धेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ते कापण्यात यावे.
३. एका गावकर्याने सांगितले की, आम्ही कधीही कुणाचीही हानी केली नाही. झाडाखाली दिवे लावणे ही आमची श्रद्धा होती आणि कोणत्याही धर्माचा अपमान नव्हता. जर ते चुकीचे असते, तर ते चर्चेद्वारे स्पष्ट करता आले असते. झाड तोडणे म्हणजे आपल्या आत्म्याला कापण्यासारखे आहे.
A century-old sacred banyan tree, revered by the Hindu community and home to a Shiva idol, was brutally cut down by Muhammad Yunus’s Islamist extremist group. Labeling it as “shirk,” they erased a symbol of devotion and trampled on the fundamental right to religious freedom.… pic.twitter.com/vZXVW6C4ls
— Voice of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VHindus71) May 6, 2025
संपादकीय भूमिकाबांगलादेशात हिंदूंनाच ठार करण्यात येत असतांना त्यांचे श्रद्धास्थान असणारे झाड कापणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! अशा घटना हेच लक्षात आणून देतात की, हिंदू आणि मुसलमान कधीही बंधूभावाने राहू शकत नाहीत ! |