‘एकदा मला आणि काही साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात आमच्याकडून काही सूक्ष्मातील प्रयोग करून घेण्यात आले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. प्रयोग १ : ‘डोळे बंद करून वातावरणात काय पालट जाणवतो ?’, हे अनुभवणे
अ. आम्ही डोळे बंद करून श्वास घेत असतांना मला वाळ्यासारखा (खससारखा) सुगंध आला.
आ. माझे मन निर्विचार झाले.
इ. मला पुष्कळच हलकेपणा जाणवला.
१ आ. प्रयोग २ : हात वर करून थोडा वेळ तसाच ठेवणे
१. आम्ही डोळे मिटलेले असतांना आम्हाला हात वर करायला सांगितले. त्या वेळी माझ्या हातांना मंद शीतलता जाणवली.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या प्रयोगांच्या वेळी जाणवलेली सूत्रे
त्या सत्संगात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी काही प्रयोग केले. तेव्हा त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
२ अ. प्रयोग १ : पंख्याच्या दिशेने हात करणे
१. सद्गुरु गाडगीळकाकांनी पंख्याच्या दिशेने हात केल्यावर ‘पंखा फिरण्याच्या गतीत आश्चर्यकारकरित्या पालट झाला. पंखा फिरण्याची गती वाढली’, असे मला जाणवले.
२ आ. तळहातावरील चमक पहाणे
२ आ १. जाणवलेले सूत्र
अ. एका साधकाच्या तळहातावर दिव्याने प्रकाश पाडल्यावर त्याच्यासमोर ठेवलेल्या स्टँडची पुसट सावली मला भिंतीवर दिसली.
आ. सद्गुरु गाडगीळकाकांच्या तळहातावर दिव्याने प्रकाश पाडल्यावर त्यांच्यासमोर ठेवलेल्या स्टँडची सावली मला भिंतीवर गडद दिसली.
(सद्गुरु गाडगीळकाकांमध्ये तेजतत्त्व आणि त्यांच्या हातावरील चमक यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या तळहातावरून प्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित झाला. त्यामुळे साधकाला त्या वेळी भिंतीवर गडद सावली दिसली. अन्य साधकामध्ये तेजतत्त्व आणि त्याच्या हातावरील चमक यांचे प्रमाण अल्प असल्याने त्या वेळी साधकाला भिंतीवर पुसट सावली दिसली. – संकलक)
२ इ. प्रयोग ३ : एका पारदर्शक भांड्यातील साध्या पाण्यात बोटे बुडवणे
२ इ १. सद्गुरु काकांनी एका (पारदर्शक) काचेच्या भांड्यातील पाण्यात हाताची बोटे बुडवल्यावर ‘पाण्याचा रंग गुलाबी झाला आहे’, असे मला दिसले.
२ ई. प्रयोग ४ : अंधारात सद्गुरु गाडगीळकाकांच्या हाताकडे पहाणे
१. मला ‘सद्गुरु काकांच्या हाताच्या बोटांमधून धूर निघत आहे’, असे दिसले.
हे सर्व पाहून मला पुष्कळ आनंद झाला. मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली.’
– श्री. सोनराज सिंह, वाराणसी (२६.७.२०२३)
|