‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी मान्यवरांकडून शुभेच्छा !

मुंबई – सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ‘आफ्टरनून व्हॉईस’ नियतकालिकाच्या संपादिका डॉ. वैदेही ताम्हण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘सनातन संस्था गेल्या २५ वर्षांपासून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. सनातन संस्था हिंदूंना धर्म आणि मूल्य यांच्या संदर्भातील ज्ञान देत आहे. सनातन संस्था हिंदु धर्माचा आधारस्तंभ आहे. संस्थेने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. गुरुमहाराज आठवलेजी (सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांचा ८३ वा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने मी सनातन संस्थेचे अभिनंदन करते आणि पुष्कळ शुभेच्छा देते. जोपर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होत नाही, तोपर्यंत सनातन संस्थेचे काम असेच चालू राहू दे. पुष्कळ शुभेच्छा !’’