ठाणे, ६ मे (वार्ता.) – येथील खारेगाव परिसरातील कावेरी हाईट्सजवळ तळमजला अधिक ३ मजले असलेली तनुजा सोसायटी आहे. या इमारतीचे बांधकाम २५ ते ३० वर्षे जुने आहे. या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर २०४ या क्रमांकची महेंद्र जगन्नाथ खरात यांच्या मालकीची खोली आहे. ६ मे या दिवशी सकाळी त्यांच्या शयनगृहातील प्लास्टर कोसळले. यात खरात यांच्या कुटुंबातील ४ जण घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.