२ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद

श्रीरामपूर – शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये ‘के.जी.एन्. ग्रुप’च्या वतीने ‘हजरत काजी बाबा चादर मिरवणूक’ चालू होती. ही मिरवणूक बजरंग चौकामध्ये आली. मिरवणुकीतील एका मुसलमानाने हातातल्या हिरव्या झेंड्याने हनुमान मंदिरासमोर असलेल्या ‘जय बजरंग तरुण मंडळा’च्या फलकावर लावलेला भगवा ध्वज खाली पाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रामा उत्तम भालेराव या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. तक्रारीवरून ‘के.जी.एन्. ग्रुप’चा अध्यक्ष इमरान जहूर ताडे आणि झेंडा फिरवणारा अनोळखी अशा २ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाछत्रपतींच्या महाराष्ट्रात धर्मांध मुसलमान भगवा ध्वज खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, हे त्यांचा उद्दामपणा वाढल्याचे लक्षण ! |