तलवारीने केक कापणार्‍या टिटवाळा येथील तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद

ठाणे, ६ मे (वार्ता.) – तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी टिटवाळा येथील राहुल जटाशंकर श्रीवास्तव (वय २८ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याने सार्वजनिक ठिकाणी रात्री १२ वाजता धारदार तलवारीने केक कापून मित्रांसमवेत वाढदिवस साजरा केला होता. या प्रकरणी वरील कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचे दर्शवणारी घटना !