पौड येथील निषेध मोर्चा !

पुणे – अन्नपूर्णामातेच्या मूर्तीची विटंबना करणार्या आरोपीला महिलांच्या कह्यात द्या, त्या त्याचा योग्य समाचार घेतील. भगवान शिवशंकराकडे प्रार्थना करते की, आई अन्नपूर्णामातेच्या संदर्भात विकृत कृत्य करणार्या विकृतीला समूळ उखडून टाकण्यासाठी शक्ती द्यावी, असे परखड भाष्य भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केले. पौड येथील श्री नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीची विटंबना केल्या प्रकरणी हिंदु संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत पौड येथे भव्य निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी उपस्थित राहिल्या होत्या, त्या वेळी त्या बोलत होत्या. श्री नागेश्वर देवस्थानाच्या जिर्णोद्धारासाठी त्यांचा खासदार निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही या वेळी त्यांनी ग्रामस्थांना दिले.
"माँ अन्नपूर्णा की मूर्ति को अपवित्र करने वाले आरोपी को महिलाओं को सौंप दो, वे उसे उचित दंड देगी।" भगवान शिव से प्रार्थना है कि वे महिलाओं को माता अन्नपूर्णा के संबंध में हो रहे विकृत कृत्यों को पूरी तरह से उखाड़ फेंकने की शक्ति प्रदान करें।
पौड़ गांव में श्री नागेश्वर महादेव… pic.twitter.com/1snL84ZnS6
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) May 5, 2025
या प्रसंगी भाजप आमदार श्री. गोपीचंद पडळकर, भोर-राजगड- मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शंकर मांडेकर, माजी आमदार श्री. संग्राम थोपटे, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, शीतलदादा शिंदे आणि मुळशी तालुक्यातील धर्माभिमानी हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, हिंदू एकत्र आला, तर काय करू शकतो हे मुळशीवासियांनी दाखवून दिले आहे. तालुक्यातील हिंदूंनी बंदची हाक देऊन तो यशस्वी तर करून दाखवलाच, त्याचसमवेत बाहेरून आलेल्या घुसखोरांना गावामध्ये कुणीही रहाण्यासाठी आणि व्यवसायासाठी जागा देऊ नये, असा निर्णय पंचक्रोशीतील सर्व गावांतील ग्रामस्थांनी घेतला. स्थानिक मुसलमानांना वगळून जे घुसखोर तालुक्यात वास्तव्यास होते, त्यांना एकाच दिवसात पिटाळून लावले. हिंदु एकतेचा विजय व्हावा, या उद्देशाने लढलेल्या मुळशी तालुक्यातील सर्व हिंदु बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन !