संत सद्गुरु श्री धोंडीराज महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने विशेष पूजा !

पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने करण्यात आलेली विशेष पूजा

पलूस (जिल्हा सांगली) – पलूसचे साक्षात्कारी संत सद्गुरु श्री धोंडीराज महाराज यांच्या ११७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने ६ मे या दिवशी विशेष पूजा करण्यात आली होती. उत्सवाच्या समाप्तीच्या निमित्ताने काल्याचे कीर्तन झाल्यावर महाप्रसाद झाला. उत्सवाच्या निमित्ताने ५ मे या दिवशी १८ वा रथोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला.