‘Love Jihad’ In Moradabad :हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील इकरार नावाच्या एका मुसलमान तरुणाने स्वतःचे राज ठाकूर असे खोटे नाव सांगून हिंदु महिलेशी लग्न केले. इकरारने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. या प्रकरणी पीडित हिंदु महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, आरोपी इकरार आणि त्याचे भाऊ यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलीस अन्वेषण चालू आहे.

१. ब्रिद्धिविहार परिसरात रहाणार्‍या या पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पुढे तिची ओळख एका तरुणाशी झाली, ज्याने स्वतःची ओळख राज ठाकूर अशी करून दिली. जेव्हा त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा तिने तिच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्याच्याशी लग्न केले. तो तिला भोजपूरमधील त्याच्या गावी पिपलसाणा येथे घेऊन गेला. त्या वेळी तो मुसलमान असल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपीसह त्याचे भाऊ, आई आणि इतर यांनी तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. आरोपीच्या भावांनी तिला धमकावले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

२. फसवणूक आणि सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु युवा वाहिनीच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

३. माझोला पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका

अशांना शरियतनुसार खड्ड्यात कमरेपर्यंत गाढून दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !