John Bolton On Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार संयम बाळगला आहे !

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचे विधान

जॉन बोल्टन

नवी देहली – मला वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फारसंयम बाळगला आहे. वर्ष २०१९ मध्येही त्यांनी असाच एक टप्पा पाहिला. पंतप्रधान मोदी यांनी त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन शहाणपण दाखवले, असे मत अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.


बोल्टन पुढे म्हणाले की, आतंकवाद्यांच्या तळांवर अचूक आक्रमण केल्यास भारताला लाभ होईल. भारताचा सूड आक्रमण करणार्‍या गटाविरुद्ध आणि अचूक असेल, तर भारताकडे कोणत्याही मोठ्या महत्त्वाकांक्षा नाहीत, हे दिसून येईल. त्यामुळे पाकिस्तानला स्वतःला वाचवण्याची संधी मिळेल. त्याआधी भारताने पाकिस्तानला आतंकवादी संघटनांवर अंकुश ठेवण्यास आणि देशातील चीनचा वाढता प्रभाव थांबवण्यास सांगावे. भारताने चीनला आतंकवाद्यांना नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासही सांगितले पाहिजे.