उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये एका हिंदु मुलीवर सतत ८ वर्षे सामूहिक बलात्कार करणार्या आणि तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणणार्या तनवीर अन्वर अन् नाझीम नावाच्या दोघा मुसलमान तरुणांना पोलिसांनी नुकतीच अटक केली.
१. वर्ष २०१७ मध्ये आरोपी तनवीर याने हरिद्वारमधील बहाद्राबाद येथील पीडित हिंदु मुलीला सर्वप्रथम प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तेव्हापासून तो तिच्यावर बलात्कार करत होता.
२. ही घटना १ मे रोजी उघडकीस आल्यानंतर कुटुंबाने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. यानंतर पोलिसांनी हरिद्वार बस स्थानकावरून मुलीला कह्यात घेतले, तसेच दोन्ही आरोपींना अटक केली. मुलीच्या म्हणण्यानुसार, तनवीर आणि नाझिम यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ते दोघे तिला नेपाळला घेऊन जाऊ इच्छित होते.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादचे वाढते प्रकार पहाता धर्मांध मुसलमान भारतीय कायद्यांना भीक घालत नाहीत, हेच लक्षात येते. सरकारी यंत्रणांना हे अत्यंत लज्जास्पद आहे. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! |