पाकिस्तानचे राष्ट्रीय आरोग्यसेवा मंत्री सय्यद मुस्तफा कमाल यांचे विधान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुम्हाला एखाद्याला मृत्यूच्या नावाने घाबरवायचे आहे; पण जर मृत्यूच त्याला आकर्षित करू लागला, तर तुम्ही काय कराल ? आपल्या सर्वांना एके दिवशी मरायचे आहे. जर नरेंद्र मोदी आपल्याला स्वर्ग देणार असतील, तर यापेक्षा चांगले दुसरे काय असू शकते ?, असे विधान ‘मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान’ या पक्षाचे नेते आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय आरोग्यसेवा मंत्री सय्यद मुस्तफा कमाल यांनी केले.
अण्वस्त्रांच्या वापराची धमकी देत मुस्तफा कमाल म्हणाले की, आपण बनवलेली अण्वस्त्रे ‘शब-ए-बारात’ला (मुसलमानांचा एक सण) फटाके फोडण्यासाठी आहेत का ?
मी पाकिस्तानी सैन्याला सांगतो, भारतीय सैन्याला येऊ द्या, त्यांना शहरांमध्ये प्रवेश करू द्या. हे २५ कोटी लोक आणि आपली संपूर्ण व्यवस्था भारतीय सैन्याला मागे जाऊ देणार नाही. भारताने युद्धाच्या धमक्या दुसर्या कुणाला तरी द्याव्यात.
संपादकीय भूमिकाभारत पाकिस्तान्यांना स्वर्गात नाही, तर नरकात ढकलणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! स्वर्गात जाण्यासाठी पाकिस्तान्यांनी कोणतेही पुण्य केलेले नसल्याने त्यांची जागा नरकातच असणार आहे ! |