Balochistan Reply To Pak Army Chief : ९३ सहस्र शरणागत पाकिस्तानी सैनिकांच्या पँट्स आजही बांगलादेशात लटकत आहेत !

पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांना बलोच नेत्याचे प्रत्युत्तर !

पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर व बलुचिस्तानचे प्रमुख नेते अख्तर मेंगल

पेशावर (पाकिस्तान) – वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा दारूण पराभव झाला होता. त्या वेळी ९३ सहस्र पाकिस्तानी सैनिक केवळ शरणागत झाले नाहीत, तर त्यांच्या पँटही काढण्यात आल्या होत्या आणि आजही त्या बांगलादेशात लटकत आहेत. हा इतिहास पाकच्या शाळेच्या पुस्तकांतून शिकवला पाहिजे, म्हणजे पुढच्या १० पिढ्यांना ते लक्षात राहील, अशा शब्दांत बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते अख्तर मेंगल यांनी पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात जनरल असीम मुनीर म्हणाले होते की, ‘बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या कपाळावरील झुंबर आहे. मुठभर लोक त्याला पाकपासून वेगळा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र पुढील १० पिढ्याही तो कुणी वेगळा करू शकणार नाही.’ यावरून मेंगल यांनी वरील प्रत्त्युर दिले.

अख्तर मेंगल पुढे म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांपासून बलुच लोक पाकिस्तानी सरकार आणि सैन्य यांच्या अत्याचारांना तोंड देत आहेत. त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आम्ही छळ सहन केला असून प्रत्येक जखम आम्हाला आजही आठवते.