Bangladesh Chinmoy Das Arrest : बांगलादेशात चिन्मय दास यांना पुन्हा अटक

अधिवक्ता सैफुल इस्लाम यांच्या हत्येचा आरोप

इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्ण दास

चितगाव (बांगलादेश) – येथील न्यायालयाने इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. चितगाव न्यायालयाचे अधिवक्ता सैफुल इस्लाम अलिफ यांच्या हत्येच्या प्रकरणी ही अटक करण्यात आली. गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर या दिवशी न्यायालयाच्या आवाराबाहेर सैफुल यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५१ जणांना अटक करण्यात आली असून त्यांतील २१ जण अजूनही कारागृहात आहेत.

यापूर्वी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या प्रकरणी कारागृहात असलेल्या चिन्मय दास यांना ढाका उच्च न्यायालयाने नुकताच जामीन संमत केला होता. चिन्मय दास गेल्या ५ महिन्यांपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली कारागृहात होते.