मोगलांचे वंशज असल्याचे सांगत लाल किल्ला मागणारी सुलताना बेगम यांची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली
नवी देहली – मोगल साम्राज्याचा शेवटचा शासक बहादूर शाह जफर याच्या पणतूची कथित विधवा सुलताना बेगम हिने सर्वोच्च न्यायालयात लाल किल्ल्याचे नियंत्रण मिळावे, यासाठी याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत ‘केवळ लाल किल्लाच का ? फतेहपूर सिक्री आणि ताजमहाल का नाही ? ते का वगळले ?’, असा प्रश्न विचारला. याद्वारे न्यायालयाने ही याचिका निरर्थक असल्याचे सांगितले.
सुलताना बेगम यांनी वर्ष २०२१ मध्ये पहिल्यांदा उच्च न्यायालयात अशी मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. उच्च न्यायालयाने याचिका प्रविष्ट करण्यास १६४ वर्षांहून अधिक विलंब झाल्याचे कारण देत ती फेटाळून लावली होती.