साटेली-भेडशीतील अनधिकृत मदरसा भुईसपाट !

संघटित हिंदूंच्या प्रखर मागणीचा परिणाम

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) – हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रखर मागणीनंतर थोरलेभरड, साटेली भेडशी येथे घरासाठी अनुमती घेतलेल्या इमारतीत चालवण्यात येणार्‍या मदरशावर ५ मे या दिवशी प्रशासनाने कारवाई करत तो भुईसपाट केला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा अनधिकृत मदरसा पाडण्यात आला. या कारवाईमुळे ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

घरासाठी अनुमती घेतलेल्या इमारतीत चालू केलेल्या या मदरशात बाहेरील मुसलमान सकाळी, दुपारी आणि रात्री नमाजपठण करण्यासाठी येत होते. याचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता. हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांसह घातलेल्या धाडीत या अनधिकृत मदरशातून २ तलवारी कह्यात घेतल्या होत्या, तसेच घरमालक अस्लम ईस्माईल खेडेकर आणि त्याच्यासोबत रहाणारा बिहार येथील बिलाल आलम शेख या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होते.

अवैध कृत्यांना थारा देणार्‍या या इमारतीत भविष्यात वेगळा प्रकार उद्भवू नये, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी हा अनधिकृत मदरसा भुईसपाट करण्याची प्रखर मागणी हिंदु संघटना आणि स्थानिक यांनी केली होती.

संपादकीय भूमिका

हिंदूंचे असे संघटनच अयोग्य प्रकार रोखू शकते. त्यामुळे हिंदूंनी संघटित आणि सतर्क राहून हिंदु धर्म रक्षणासाठी प्रयत्नरत रहायला हवे !