सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.७४ टक्के

सावंतवाडी – कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा निकाल ९८.७४ टक्के इतका लागला आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.२७ टक्के

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ सहस्र २६६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ सहस्र १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.२७ टक्के इतके आहे. जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या ४ सहस्र १५ मुलींपैकी ३ सहस्र ९८६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ४ सहस्र ५२१ मुलांपैकी ४ सहस्र १७६ मुले उत्तीर्ण झाली. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.२३ टक्के आहे.