
दौंड (जिल्हा पुणे) – शहरातील खाटीक गल्ली येथे ४ मे या दिवशी गोहत्या होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दौंड पोलीस पथक आणि मानद पशूकल्याण अधिकारी त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळी आले. आरोपी आलम शेख आणि अझीम शेख त्यांच्या घरासमोर रहाणारे दिलीप कांबळे यांच्या घरात गोमांस टाकून पळाले. पोलिसांनी केलेल्या पडताळणीत आलम शेखच्या घरातही गोमांस आढळून आले.
पशूवैद्यकीय अधिकार्याच्या उपस्थितीत गोमांसाचे नमुने घेऊन पोलिसांनी जप्त केलेले ८५० किलो गोमांस नष्ट केले. २९ एप्रिलला केलेल्या पोलीस कारवाईत खाटीक गल्ली, दौंड येथे १ सहस्र २०० किलो गोमांस पकडण्यात आले होते आणि ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायी आणि गोमांस यांची तस्करी चालू असणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! |