‘गेल्या दोन मासांत सेवेच्या निमित्ताने माझा फोंडा (गोवा) येथील श्री. मिलिंद बोकाडे यांच्याशी संपर्क आला. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. नम्रता
अ. मिलिंददादांच्या बोलण्यात पुष्कळ नम्रता असते. सेवेच्या संदर्भात भ्रमणभाषवर बोलतांना ते माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतात आणि नंतर त्यावर समर्पक उत्तर देतात.

आ. साधकांच्या चुका सांगतांना ते स्पष्टपणे; पण प्रेमाने अन् नम्रपणे सांगतात. त्यामुळे साधकांना त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते.
२. नियोजनकौशल्य
मिलिंददादांचे प्रतिदिन सेवेचे परिपूर्ण नियोजन असते. त्यात ‘त्यांच्या आईची सेवा, घरातील सर्व सेवा, व्यष्टी साधना, समष्टी साधना’ इत्यादी सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतो.
३. दादांच्या आई वयस्कर आहेत, तसेच त्यांची प्रकृती बरी नसते. ते आईची सेवा प्रेमाने आणि आनंदाने करतात.
४. ते प्रत्येक प्रसंगाचा सखोल आणि सूत्रबद्धरित्या अभ्यास करतात.
५. ते साधकांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात.
‘गुरुकृपेने माझा मिलिंददादांशी संपर्क आला आणि मला त्यांच्याकडून पुष्कळ सूत्रे शिकायला मिळाली’, यासाठी मी गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. लता दीपक ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६५ वर्षे), बांदिवडे, गोवा. (१२.३.२०२५)