वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी परदेशी चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाल्यावर त्यांच्यावर १०० टक्के कर आकारला जाईल, असे घोषित केले. त्यांनी सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ करून याविषयी माहिती दिली, तसेच वाणिज्य विभागाला त्याविषयी आदेश दिला. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, विदेशात बनवलेले चित्रपट अमेरिकाविरोधी प्रचार करू शकतात. त्यामुळे ते अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. हा कर कसा आकारला जाईल ?, याविषयी अजूनही सुस्पष्टता नाही.
🎬 BREAKING: US President Donald Trump announces 100% tariffs on all foreign films! 🇺🇸
A massive jolt to global cinema — and a major blow to the Indian film industry as the move sends shockwaves worldwide.#Geopolitics #Tariffwar pic.twitter.com/JDP8EB5tkQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2025
अमेरिकेत चित्रपट निर्मिती २६ टक्क्यांनी घटली !
अमेरिकेत चित्रपट निर्मितीचे प्रमाण सतत अल्प होत आहे. एका अहवालानुसार वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये अमेरिकेत चित्रपटाच्या निर्मितीत २६ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या लॉस एंजेलिस शहरातील परिस्थिती बिकट आहे. चित्रपट उद्योगाशी संबंधित संस्था ‘मोशन पिक्चर असोसिएशन’च्या मते वर्ष २०२३ मध्ये अमेरिकन चित्रपटांनी जगभरात केवळ २२.६ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. अमेरिकेबाहेर चित्रपट बनवले जात आहेत, याविषयी ट्रम्प यांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे. जर एखाद्याला अमेरिकेत चित्रपट बनवायचा नसेल, तर त्याच्याकडून कर आकारला पाहिजे.