सनातनच्या साधकांना सूचना
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मप्रसारासाठी मार्च १९९९ मध्ये सनातन संस्थेची स्थापना करून अनेक ठिकाणी अभ्यासवर्ग, जाहीर मार्गदर्शन, सर्व संप्रदाय सत्संग, संतांच्या भेटीगाठी आदी निमित्ताने भ्रमण केले आहे. गुरुदेवांच्या मार्गदर्शनामुळे मागील २६ वर्षांत सहस्रो साधकांनी गुरुकृपायोगानुसार साधना करून आनंदप्राप्ती केली आहे.
ज्या सनातनच्या साधकांना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी होण्याचा निरोप देणे अनवधानाने राहिले असल्यास आणि त्यांना महोत्सवास उपस्थित रहाण्याची इच्छा असल्यास त्यांनी ७०५८८८५६१० या क्रमांकावर ८ मे या दिवशी दुपारी १२ पर्यंत पुढील माहिती ‘व्हॉटसॲप’ मेसेजने पाठवावी.
१. संपूर्ण नाव
२. जिल्हा
३. कोणत्या काळात संस्थेच्या संपर्कात होते ?
त्यानंतर आपणांस आयोजन समितीकडून संपर्क करण्यात येईल.
– विश्वस्त, सनातन संस्था