टॉरंटो (कॅनडा) – शहरात खलिस्तानवाद्यांनी नुकताच हिंदूविरोधी मोर्चा काढला. देशात वास्तव्य करणार्या ८ लाख हिंदूंना भारतात पाठवण्याची मागणी या वेळी करण्यात आली. याविषयीची माहिती शॉन बिंदा या व्यक्तीने ‘एक्स’वरून प्रसारित केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माल्टन गुरुद्वारा येथे खलिस्तानी टोळीने ८ लाख हिंदूंना भारतात पाठवण्याची मागणी केली. हे हिंदू त्रिनिदाद, गयाना, सुरीनाम, जमैका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, केनिया आणि इतर अनेक देशांतील आहेत. हा भारत सरकारचा निषेध नाही, तर हा स्पष्टपणे हिंदूंद्वेष आहे.
कॅनेडियन पत्रकाराने पंतप्रधानांना जाब विचारला !
कॅनेडियन पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनीही शहरातील माल्टन गुरुद्वाराच्या परिसरात काढण्यात आलेल्या हिंदूविरोधी मोर्चाचा व्हिडिओ ‘एक्स’वरून प्रसारित केला. हा व्हिडिओ बोर्डमन यांनी कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांना ‘टॅग’ करून, ‘तुम्ही माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याप्रमाणे खलिस्तानवाद्यांशी सौम्य वर्तन करणार कि त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेणार ?’, असा प्रश्न विचारला. ‘आपल्या रस्त्यावर दहशत पसरवणारे जिहादी आपल्या सामाजिक रचनेला हानी पोचवत आहेत आणि उघडपणे धमकावत आहेत; पण द्वेष पसरवण्याच्या या शर्यतीत खलिस्तानीही मागे नाहीत. मार्क कार्नी यांचा कॅनडा जस्टिन ट्रुडो यांच्या कॅनडापेक्षा वेगळा असेल का ?’, असा प्रश्नही पत्रकार बोर्डमन यांनी विचारला आहे.
संपादकीय भूमिकाकॅनडामध्ये पंतप्रधान पालटले; मात्र खलिस्तानवाद्यांचा उद्दामपणा काही कमी झालेला नाही. अशांना वठणीवर आणण्यासाठी भारत सरकार कॅनडा सरकारवर दबाव आणणार का ? |