शस्त्रास्त्रे जप्त

अमृतसर (पंजाब) – येथील पोलिसांनी खलिस्तानी आतंकवाद्यांशी संबंधित गुंड धर्मप्रीत सिंह उपाख्य धरम संधू याच्याशी संबंधित विजय मसीह, अग्रेज सिंह आणि इक्बाल सिंह या ३ जणांना अटक केली आहे.
पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, अटक केलेले तिन्ही आरोपी तरणतारन जिल्ह्यातील आहेत. प्राथमिक अन्वेषणात असे दिसून आले आहे की, हे तिघेही आरोपी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधित होते आणि शस्त्रास्त्र तस्करीत सक्रीय भूमिका बजावत होते. आरोपींकडून ४ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले आहेत. यासह ३ ग्लॉक पिस्तूल, ३ बेरेटा पिस्तूल, २० जिवंत काडतुसे (९ मि.मी.), २० जिवंत काडतुसे (३० बोअर) आणि १ ॲक्टिव्हा स्कूटर जप्त करण्यात आली आहे. या तिघांच्या चौकशीतून आतंकवाद्यांच्या जाळ्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.