|
ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर बांगलादेशात कट्टरतावाद आणि धार्मिक उन्माद वाढला आहे. बांगलादेशातील कट्टरपंथी इस्लामी गट ‘हिफाजत-ए-इस्लाम’ने सहस्रो समर्थकांसह राजधानी ढाका शहरातील सुहरावर्दी उद्यानात नुकतेच शक्तीप्रदर्शन केले. महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या महिला व्यवहार सुधारणा आयोगाला आव्हान देणे, हा या सभेचा मुख्य उद्देश होता; कारण महिला व्यवहार सुधारणा आयोगाच्या शिफारशी इस्लामविरोधी असल्याचे त्यांचे मत आहे. ‘हिफाजत-ए-इस्लाम’ हा मदरसे किंवा धार्मिक शाळा यांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांचा एक प्रभावशाली दबाव गट मानला जातो.
🚨 Massive Islamist protest in Bangladesh! 🇧🇩
Radicals demand removal of the Women's Affairs Reform Commission, calling its gender-equality push “un-Islamic.” 🤯
Disturbing visuals show mobs beating & shoeing a woman’s effigy — a chilling attack on women's rights.
As violence… pic.twitter.com/CQqroH98gk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2025
१. या सभेत बोलतांना कट्टरपंथियांनी मुसलमान महिलांना मालमत्तेमध्ये आणि इतर अधिकारांमध्ये समान अधिकार देणार्या आयोगाच्या शिफारशींना लक्ष्य केले.
२. ‘हिफाजत-ए-इस्लाम’चे ज्येष्ठ नेते मौलाना महफुझुल हक यांनी १२ कलमी मागण्यांची सूची सादर केली. यामध्ये पहिली मागणी होती की, विद्यमान महिला सुधारणा आयोग रहित करून इस्लामी विद्वान आणि महिला प्रतिनिधी यांचा समावेश असलेला एक नवीन आयोग स्थापन करणे.
३. संघटनेचे दुसरे नेते मामुनुल हक यांनी आयोगाच्या सदस्यांना शिक्षा करण्याची मागणी केली; कारण त्यांच्या मते पुरुष आणि महिला कधीही समान असू शकत नाहीत.
४. मदरशातील शिक्षक महंमद शिहाब उद्दीन म्हणाले की, कुराणात पुरुष आणि स्त्री यांच्यासाठी जीवनाचे विशिष्ट नियम सांगितले असून त्यापलीकडे कुठला विचार करता कामा नये.
संपादकीय भूमिकाअशांना आता कुणी प्रतिगामी किंवा महिलाविरोधी का म्हणत नाही ? |