मुंबईत कोस्टल रस्त्यावर वाहनांचा भीषण अपघात; ९ जण घायाळ !

प्रतीकात्मक चित्र

मुंबई – येथील कोस्टल रस्त्यावर ४ ते ५ वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. यात ९ जण घायाळ झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात वाहनांची पुष्कळ हानी झाली आहे. यात चारचाकी, टॅक्सी आणि इतर वाहने यांचा समावेश होता.

गेल्या काही दिवसांपासून सुसाट गतीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणार्‍यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे.