भरधाव मर्सिडीजच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

पुणे – बेंगळुरू-पुणे महामार्गावर वडगाव पुलावरील विशाल हॉटेलजवळ पहाटे भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वारला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार कुणाल हुशार याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मागे बसलेल्या प्रज्योत पुजारी याला गंभीर दुखापत झाली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी शुभम भोसले या कारचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
निखिल रानवडे, श्रेयस सोलंखी आणि वेदांत राजपूत असे चारचाकीरमध्ये असलेल्या इतर तिघांची नावे आहेत. हे चौघेही मद्याच्या नशेत असून त्यांनी प्रथम हिंजवडीत मद्य घेतले आणि नंतर कात्रज येथे गेले.
संपादकीय भूमिकासर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |