कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे बनणार वाहतूक व्यवस्थेचा हब !

नाशिक – वर्ष २०२७ मध्ये येथे भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाची प्राथमिक समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक रोड रेल्वेस्थानकाजवळ प्रस्तावित ‘मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’विषयी सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प रेल्वे, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचे एकत्रित संयोजन साधण्याच्या दृष्टीने सिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे कुंभमेळ्याच्या काळातील गर्दीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे.