रूद्राक्षाची माळ घातल्याने हिंदु महिलेला मुसलमानांकडून मारहाण !

अवंतिका एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना !

धारदार वस्तूने आक्रमण करण्याचा प्रयत्न

वापी पोलिसांकडून साहाय्य मिळाले नाही

पालघर – मुंबईकडून इंदूरकडे जाणार्‍या अवंतिका एक्सप्रेसमध्ये अधिवक्त्या शीतल भोसले यांना मुसलमानांनी मारहाण केली. त्यांनी हातात रूद्राक्षाची माळ घातली होती आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव होते. याविषयी आक्षेप घेत मुसलमान महिला आणि तिचे नातेवाईक यांनी त्यांना मारहाण केली.

१. प्रवासात मुसलमान महिलेने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही हे रूद्राक्ष का वापरता ? ते बकवास (निष्फळ) आहे.’’ यावर अधिवक्त्या भोसले म्हणाल्या, ‘‘मला तुझ्या बुरख्याचा त्रास होतो, असे मी म्हटले का ? मग तुला माझ्या माळांचा त्रास का होतो ?’’

२. यावर त्या महिलेने त्यांच्यावर धारदार वस्तूने वार केला. ‘तिला मानेवर वार करायचा होता; पण मी तो वार चुकवला; मात्र माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली’, असे अधिवक्त्या भोसले यांनी म्हटले. त्या महिलेने अधिवक्त्या भोसले यांना विवस्त्रही करण्याचा प्रयत्न केला.

३. बोरीवलीनंतर अवंतिका एक्सप्रेस थेट वापी स्थानकावर थांबते. तेथे शीतल भोसले यांनी होमगार्ड आणि स्थानिक पोलीस यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र साहाय्य मिळाले नाही. रेल्वे हेल्पलाईनवर तक्रार प्रविष्ट केल्यावर वलसाड येथे रेल्वे पोलिसांनी आक्रमणकर्ती महिला आणि पुरुष यांना कह्यात घेतले.

४. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ही गोष्ट समजल्यावर रेल्वेस्थानकात गर्दी झाल्याने स्थानिक शहर पोलिसांच्या साहाय्याने बंदोबस्त वाढवण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • रूद्राक्षाची माळ घातल्याने हिंदु महिलेला मारहाण करणार्‍या मुसलमान महिलेचा उद्दामपणा लक्षात घेऊन तिला कठोर शिक्षा होणे आवश्यक !
  • रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी होते. तरीही अशी घटना घडली  याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक संपला आहे, हेच लक्षात येते !