मिरज शासकीय रुग्णालयातून ३ दिवसांच्या बाळाची अज्ञात महिलेकडून चोरी !

प्रतिकात्मक चित्र

मिरज (जिल्हा सांगली), ४ मे (वार्ता.) – येथील पंढरपूर रस्त्यावरील शासकीय रुग्णालयातून ३ दिवसांच्या नवजात बाळाला अज्ञात महिलेने पळवून नेले आहे. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर रुग्णालयाचे प्रशासन खडबडून जागे झाले असून रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, तसेच बाळाचे नातेवाईकही संतप्त झाले आहेत. सौ. कविता समाधान अलदर (रा. कोळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर) या महिलेला प्रसुतीनंतर मुलगा झाला होता. ३ मे या दिवशी सकाळी ११ वाजता औषध देण्याच्या बहाण्याने एक अनोळखी महिला बाळ घेऊन पसार झाली.