बँक अधिकार्‍याने खातेदाराची केली सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – एका अधिकोषातील (बँकेतील) आकाशसिंह राणा या अधिकार्‍याने ज्येष्ठ दांपत्याचा विश्वास संपादन केला. त्यांच्या खात्यातून परस्पर १ कोटी ६५ लाख ८२ सहस्र रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी आरोपीस अटक केली. न्यायालयाने आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तक्रारदार हा सिंगापूर येथे वास्तव्यास आहे. त्यांनी आई आणि वडील यांच्या नावे गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीसाठी बँकेतील राणा या अधिकार्‍यावर विश्वास ठेवला. आरोपीने जून २०१८ ते मार्च २०२३ या कालावधीत वृद्धापकाळ आणि कोरोना महामारी यांचा अपलाभ घेऊन खात्यातून पैसे काढून घेतले.