पुणे – कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील रस्ते सुस्थितीत केल्यावर यापुढे ते खोदले जाणार नाहीत, असा शब्द महापालिकेच्या पथ विभागाने दिला होता; मात्र त्यानंतरही रस्ते खोदल्याने हे खोदकाम करणारा संबंधित ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक आणि काम करण्यास सांगणार्या व्यक्ती यांविरोधात गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती पथ विभागाने दिली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता कुणालाही रस्ते खोदण्यासाठी अनुमती मिळणार नाही, असे पथ विभागाने घोषित केले होते; मात्र शहरातील सुस्थितीत असलेले रस्ते खोदण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. यामध्ये धायरी, विजयानगर कॉलनी, पद्मावती या परिसरांसह शहराच्या इतर भागातील रस्त्यांचा समावेश आहे. अनुमती नसतांना रस्ते खोदल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद होईल. तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाची तक्रार बांधकाम विभागाकडे केली जाईल, असे पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाविनाअनुमती खोदकाम करणार्यांना कुणाचे पाठबळ मिळते, हेही शोधून काढायला हवे. कशाचेच भय राहिले नसल्याचे हे द्योतक आहे ! |