पुणे – बनावट नोटा चलनात आणणार्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी २ महिलांसह ५ जणांना अटक करून त्यांच्याकडून २८ लाख ६६ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. मनीषा ठाणेकर, भारती गावंड, सचिन योगी, नरेश शेट्टी आणि प्रभू गुगलजेड्डी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. (बनावट नोटा प्रकरणात महिलांचा सहभाग दुर्दैवी ! – संपादक)
शेट्टी हा या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असून गुगलजेड्डी हा त्याचा मेहुणा आहे. गुगलजेड्डी हा परराज्यातील टोळीकडून बनावट नोटा आणून बाजारात वितरीत करत असे. त्यासाठी त्यांनी मनीषा ठाणेकरचे साहाय्य घेतले. आरोपी शेट्टी आणि गुगलजेड्डी हे १ लाख रुपयाच्या मोबदल्यात २ लाख रुपयांच्या बनावट नोटा देत होते. संबंधित टोळीच्या मुख्य सुत्रधाराला पकडण्यासाठी पोलिसांची पथके परराज्यात रवाना झाली आहेत.