मिरज येथे हिंदु एकता आंदोलन शाखेच्या नवीन फलकाचे उद्घाटन !

सांगली, ४ मे (वार्ता.) – हिंदु एकता आंदोलन संघटनेने वर्ष १९८० मध्ये राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा झाला पाहिजे, काश्मीरमधील कलम ३७० हटवले पाहिजे, तसेच अयोध्या येथे श्रीराममंदिर उभारले पाहिजे, यासाठी आंदोलने केली होती. यातील बर्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता देशातील मुसलमानांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुसलमानांसाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्यासाठी हिंदु एकता आंदोलन लढा उभा करणार आहे, अशी घोषणा हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी येथे केले.
जिल्ह्यातील मिरज येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने पारंपरिक शिवजयंती हिंदमाता चौकात साजरी करण्यात आली. या वेळी श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले, तसेच मिरज शहरातील हिंदमाता चौक येथे हिंदु एकता आंदोलन शाखेच्या नवीन फलकाचे उद्घाटन श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदु एकता आंदोलनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. दत्ता भोकरे होते. कार्यक्रमाचे संयोजन मिरज तालुका अध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे यांनी केले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सांगलीवाडी विभाग अध्यक्ष सर्वश्री अनिरुद्ध कुंभार, पै. प्रदीप निकम, किशोर झांबरे, विकास पाटील, सचिन भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.