तनिषा भिसे प्रकरणी सरकारकडून साहाय्य !

मृत तनिषा भिसे (उजवीकडे)

पिंपरी (पुणे) – येथे प्रसुती झाल्यानंतर उपचाराच्या वेळी मृत्यू झालेल्या तनिषा भिसे या महिलेच्या जुळ्या मुलींच्या उपचारांचा व्यय राज्य सरकारने उचलला आहे. या जुळ्या बालकांवर वाकड येथील ‘सूर्या मदर अँड चाईल्ड केअर’ या रुग्णालयाच्या अधिकोष खात्यावर २४ लाख रुपये ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे. भाजपचे आमदार यांचे स्वीय साहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचे प्रसुतीनंतर निधन झाले होते. ‘त्यांच्या मुलींवर होत असलेल्या वैद्यकीय उपचारांचा व्यय सरकारने उचलावा’, अशी मागणी गोरखे यांनी केली होती.