अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, म्हणजे ३०.४.२०२५ या दिवशी पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांचा ६३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची लहान बहीण सौ. श्रुति सहकारी यांनी दिलेल्या कवितारूपी शुभेच्छा पुढे दिल्या आहेत.

कृष्णमंदिरी कृष्णसख्याचे कोमल चरण ते वास करी ।
फूल होऊनी अर्पण होण्या एक ‘ज्योती’ (टीप १) प्रयत्न करी ।। १ ।।

कृतज्ञतेचा भाव मनी अन् तळमळ असे हृदयांतरी ।
‘ज्योतसे ज्योत जगाओ’ या ध्येयाने ती अविरत प्रयत्न करी ।। २ ।।
यत्न पाहुनी हसे कृष्ण अन् चैतन्याची उधळण करी ।
बिंदाईंच्या रूपात तो गं, तुझ्यावर कृपा करी ।। ३ ।।
संतपद गाठण्या सूक्ष्मरूपे कृष्ण तुझा हात धरी ।
गुरुकृपाही असे ‘अक्षय्य’ जीवन तुझे कृतार्थ करी ।। ४ ।।
नमस्कार असो आमुचा तुजला आजच्या या शुभदिनी ।
आशिष आम्हा मिळावा, ही प्रार्थना तव चरणी ।। ५ ।।
टीप १ – ज्योती – पू. (सौ.) ज्योती ढवळीकर
टीप २ – बिंदाई – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– सौ. श्रुति सहकारी (वय ५९ वर्षे) (पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची लहान बहीण), फोंडा, गोवा. (५.३.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |