निर्धार करू या भूमीवर ‘सनातन राष्ट्र’ आणण्याचा ।

श्रीकृष्ण करत असे शंखनाद ।
भावभक्तीची उधळण करूया अंतरात ।
‘सनातन राष्ट्रा’चा गजर करण्या ।
सनातनचे वीर उभे ठाकले रणांगणात ।। १ ।।

श्री. संकेत भोवर

गोमंतक भूमीतून होई आरंभ ।
जणू शोभे ‘सनातन राष्ट्रा’चा महाकुंभ (कुंभमेळा) ।
हनुमंतरायास आर्त हाक घालूया ।
हृदयातून गुरुदेवांचे (टीप) स्मरण करूया ।। २ ।।

जपयज्ञ, होमहवन, असे दिशा या कार्यक्रमाची ।
साधकांना साधनारत रहाण्या आवश्यकता असे चैतन्याची ।
शंखनादातून घुमे ‘सनातन राष्ट्र्रा’ची ललकारी ।
संघटित व्हा हिंदूंनो, दिशा ठरवू ‘सनातन राष्ट्रा’ची ।। ३ ।।

संत-महंत म्हणती ‘सनातन राष्ट्र’ कसे असेल ।
देवता आपल्या वाणीतून करती वर्णन ।
प्रथम धर्म अन् राष्ट्र यांचा विचार असेल ।
सात्त्विक जनता अन् सगळीकडे आनंद दिसेल ।। ४ ।।

दुर्गुणांचा नाश होईल, सद्गुणांची वाढ होईल ।
‘भगवंताचे स्मरणच’ जीवनाचे सार असेल ।
द्वापरयुग, त्रेतायुग डोळ्यांसमोर दिसेल ।
लोकहो, पहा ‘सनातन राष्ट्र’ असे असेल ।। ५ ।।

देवतांची वाणी ऐकण्या आतुर झालात ।
जमूया सारे या ‘सनातन राष्ट्र’ महोत्सवास ।
निर्धार करू या भूमीवर सनातन राष्ट्र आणण्याचा ।
जयजयकार करू हनुमंताचा, जयजयकार करू गुरुदेवांचा ।। ६ ।।

टीप : गुरुदेव – परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.४.२०२५)