सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री मधुरा भोसले यांनी वर्णिलेली पू. (सौ.) ज्योती सुदिन ढवळीकर यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

सनातनच्या १३२ व्या समष्टी संत पू. (सौ.) ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६३ वर्षे) या २४.२.२०२५ या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. गुरुकृपा आणि त्यांची साधना यांमुळे त्यांनी संतपद प्राप्त केले. या लेखामध्ये आपण त्यांना संतपदापर्यंत नेणार्‍या त्यांच्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत. २.५.२०१५ या दिवशी या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/909255.html

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर

५ ऐ. समष्टी भाव आणि समष्टी तळमळ : त्यांच्यामध्ये समष्टीतील ईश्वराप्रती पुष्कळ भाव आहे. या भावामुळे त्यांना भगवंताचे दर्शन केवळ मूर्तीमध्ये न होता जनमानसांत होते. ‘समाजातील विविध लोकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असा त्यांचा समष्टी भाव आणि समष्टी तळमळ असल्यामुळे त्या समाजाला साधना करण्यासाठी सहजरित्या प्रवृत्त करतात. त्यामुळे त्यांच्याकडून व्यष्टी स्तरावरील सेवा आणि समष्टी स्तरावर धर्म अन् अध्यात्म यांच्या प्रसाराची सेवा अत्यंत भावपूर्ण अन् तळमळीने होते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

६. पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्यामध्ये त्यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार कार्यरत झालेल्या दैवी घटकांच्या प्रक्षेपणाचे प्रमाण आणि त्यांना पाहून साधकांना येणार्‍या अनुभूती

७. पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांनी विविध योगमार्गांनी केलेल्या साधनेचे प्रमाण, त्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावर झालेले लाभ, त्यांच्यात विकसित झालेले दैवी गुण आणि त्यांना प्राप्त झालेले बळ 

टीप १ – सानंद समाधी : या समाधी अवस्थेमध्ये सतत आनंद जाणवत असल्यामुळे या समाधी अवस्थेला ‘सानंद समाधी’, असे संबोधले आहे.

टीप २ – मेधाबुद्धी : जेव्हा सात्त्विक बुद्धी सूक्ष्मतम स्तरावर कार्यरत होते, तेव्हा तिचे प्राकट्य दिव्यतर असल्यामुळे तिला ‘मेधा’ म्हणतात.

८. पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्यामध्ये कार्यरत झालेल्या दैवी तेजांचे प्रमाण आणि त्यामुळे सूक्ष्म स्तरावर होणारे कार्य

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखन करण्याचा दिनांक अन् वेळ : २८.३.२०२५, दुपारी ४ ते ४.२१)

(क्रमश: )

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/910627.html

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक