नोएडा (उत्तरप्रदेश) – पाकिस्तानातून भारतात येऊन भारतीय हिंदु तरुणाशी विवाह करणार्या सीमा हैदर हिच्यावर एका व्यक्तीने आक्रमण केले. सदर व्यक्तीने सीमा हिच्या घरात घुसून तिचा गळा दाबला, तसेच तिला मारहाण केली. या वेळी सीमाच्या घरातील लोकांनी लगेच या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची मानसिक स्थिती ठीक नाही. तो गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात रहाणारा आहे.