Yoga Guru Padmashri Shivanand Baba : योगगुरु पद्मश्री शिवानंद बाबा यांचे वयाच्या १२८ व्या वर्षी निधन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील योगगुरु पद्मश्री शिवानंद बाबा यांचे ३ मेच्या रात्री वयाच्या १२८ व्या वर्षी निधन झाले. बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांचे पार्थिव दुर्गाकुंड येथील आश्रमात आणण्यात आले. ४ मे या दिवशी येथील हरिश्चंद्र घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्गाकुंडमधील कबीरनगरमध्ये स्वामी शिवानंद यांचा आश्रम आहे. या वयातही ते नियमित योगाभ्यास करत असत. त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्याचे श्रेय शिस्तबद्ध दैनंदिन दिनचर्या, योग, प्राणायाम आणि घरगुती उपचार यांना दिले होते.