
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकात सुहास शेट्टी यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठ नेते शरण पंपवेल यांच्यासह ३ ते ५ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते असलेले भरत कुम्मेळू यांना सामाजिक माध्यमाद्वारे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘आम्ही ५ मेच्या रात्री ९.३० वाजता तुझ्याच ठिकाणी येऊन तुझी हत्या करू,’ अशा आशयाचा धमकीचा मजकूर पोस्ट करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसचे राज्य असल्याने धर्मांध मुसलमानांना मोकळे रान मिळाल्याने ते अशा प्रकारे उद्दाम होऊन धमक्या देत आहेत. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक ! |