Muslim Woman Near Ram Mandir : श्रीराममंदिराजवळ संशयित मुसलमान महिला कह्यात

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन परतणार्‍या एका मुसलमान महिलेला सुरक्षारक्षकांनी कह्यात २ मे या दिवशी कह्यात घेतले. या महिलेचे वागणे संशयास्पद वाटल्याने तिला कह्यात घेऊन तिची कसून चौकशी करण्यात आली. ती महाराष्ट्रातील वर्धा येथील रहाणारी असून मंदिरात ती दर्शनसाठी आली होती. तिच्या कुटुंबांशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्यांनी ‘ही महिला थोडी मानसिक रोगी असून ती सतत इकडे तिकडे फिरत असते’, असे सांगितले. (यावर विश्वास कसा ठेवणार ? – संपादक)


यापूर्वी १४ एप्रिल या दिवशी श्रीराममंदिरावर बाँबने आक्रमण करण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर येथील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. अयोध्येतील रहिवासी अब्दुल रहमान याला ३ मार्च या दिवशी हरियाणातील फरीदाबाद येथून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे २ हातबाँबही सापडले होते.