इडुक्की (केरळ) – येथे ४ वर्षांपूर्वी एका मूकबधिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने ३२ वर्षीय दोषीला मरेपर्यंत कारागृहात ठेवण्याची शिक्षा सुनावली आहे. यासह ३ लाख ११ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम पीडितेला देण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पीडित मुलीला पुरेशी भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बलात्काराची घटना ४ ऑगस्ट २०२१ या दिवशी घडली होती.
संपादकीय भूमिकाअशांना आयुष्यभर पोसत रहाण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा देण्याचीच आवश्यकता आहे ! |