Pakistani Spies Arrested : पंजाबमध्ये पाकसाठी हेरगिरी करणार्‍या २ जणांना अटक

अटक करण्यात आलेले पाकिस्तानी हेर पलक शेर मसीह आणि सूरज मसीह

अमृतसर (पंजाब) – पाकसाठी हेरगिरी करणार्‍या पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केली. हे दोघेही भारतीय सैन्याची माहिती पाकला पाठवत होते. त्यांचे संबंध पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी असून त्यासाठी हरप्रीत सिंह उपाख्य पिट्टू उपाख्य हॅपी याने पुढाकार घेतला होता. पिट्टू सध्या अमृतसर मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. या दोघांनी सैनिकी छावण्या आणि वायूदल तळांची छायाचित्रे पाकला पाठवली आहेत.

संपादकीय भूमिका

अशांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा !