श्रीगंगानगर (राजस्थान) – येथील पाकच्या सीमेवरून भारतात घुसणार्या पाकच्या एका सैनिकाला भारतीय सीमा सुरक्षा दलाने अटक केली. त्याने कुठल्या उद्देशाने सीमा ओलांडली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच चुकून सीमा ओलांडून पाकच्या सीमेत पोचलेल्या भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या पूर्णम् साहू नावाच्या सैनिकाला पाकिस्तानने अटक केली होती. त्याला पाकने अद्यापही सोडलेले नाही.