(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)

ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील निलोनी गावात असलेल्या एका मशिदीच्या महंमद गजनफर नावाच्या इमामला अटक करण्यात आली आहे. अनुमाने ३ महिन्यांपूर्वी त्याने उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात झालेल्या धार्मिक हिंसाचाराशी संबंधित एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये प्रक्षोभक आणि धार्मिक उन्माद पसरवणार्या गोष्टी सांगितल्या गेल्याचा आरोप आहे. तो मूळचा बिहारमधील अररिया जिल्ह्यातील कुर्सेल गावचा रहिवासी आहे.
संपादकीय भूमिकादेशातील प्रत्येक मशिदीचा इमाम, मौलाना आणि मौलवी यांची सूची बनवून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या लोकांकडून धर्मांध मुसलमानांना चिथावणी देऊन हिंदूंच्या विरोधात हिंसाचार घडवला जातो, असेच आतापर्यंतच्या घटनांत दिसून आले आहे ! |