
नवी देहली – केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४१ व्या बटालियनचा सैनिक मुनीर अहमद याने पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्यावरून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मुनीर अहमद याने पाकिस्तानातील सियालकोट येथील रहिवासी मीनल खान हिच्याशी लग्न केले आहे. मीनलचा व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का) संपल्यानंतरही त्याने तिला अवैधपणे भारतात ठेवले.
🚨 National Security Breach 🚨
CRPF jawan Munir Ahmed sacked for hiding marriage to a Pakistani woman.
He knowingly sheltered her even after her visa expired — a serious violation of service rules and a direct threat to national security.
This comes just days after the… pic.twitter.com/YFtjBJNaJP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2025
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रहित केले होते. मीनल खान हिलाही देश सोडण्याची नोटीस मिळाली. याविरोधात मुनीर याने जम्मूतील भालवाल न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली. याचिकेत म्हटले आहे की, मीनलने मे २०२४ मध्ये मुनीर खान याच्याशी ऑनलाइन लग्न केले. मीनल मार्च २०२५ मध्ये अल्पकालीन व्हिसावर भारतात आली. तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. सध्या हा अर्जगृह मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
संपादकीय भूमिकाकेंद्रीय राखीव पोलीस दलाचा सैनिक काय करत आहे, याकडेही गुप्तचरांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हेच यावरून लक्षात येते ! |