सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात (प्राथमिक) कार्यरत २ प्राथमिक शिक्षकांवर गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र यांनी कारवाई केली आहे. मद्यपान करून मुलांना मारहाण करणे आणि झाराप पेट्रोलपंप येथे गांजा सेवन करणे या दोन प्रकरणी गुन्हा नोंद असलेले जिल्हा परिषद शाळा तांबोळी क्रमांक १ चे विनायक रामचंद्र पाटील यांना बडतर्फ करण्यात आले आहे, तर वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आणि अनधिकृतरित्या अनुपस्थित रहाणे या २ कारणांसाठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या शिक्षिका श्रीमती सुचिता नितीन बागवे यांना सक्तीने सेवानिवृत करण्याची कारवाई करण्यात आली आहे.