
पुणे – गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने १३ लाख २८ सहस्र रुपयांचा ६४ किलो गांजा हस्तगत केला. या प्रकरणी पोलिसांनी पप्पू देवरी, चंदन सुभाष कुंवर आणि राकेश पावरा यांना अटक करण्यात आली आहे. ओदिसा आणि धुळ्यातून पुणे शहरांमध्ये गांजा विक्रीसाठी येत असल्याचे उघडकीस आले.